ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पोखरण शाळा क्र. १ च्या शतक महोत्सवी वर्षाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.

पोखरण शाळा क्र. १ च्या शतक महोत्सवी वर्षाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.

प्रकाशन: 03 Jan 2023 12:19 PM
वाचन संख्या 62

गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात येत असून शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व काळात शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्व जाणून घेऊन १९२४ साली पोखरण शाळेची स्थापना झाली.हि गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. शेतकरी, गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेची इमारत बांधली असून आज हीच शाळा दिमाखात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेत शिक्षण घेऊन आज मोठ मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत.विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे. प्राथमिक शाळेत सर्व सोयी सुविधा असणे गरजेचे आहे.गुणवत्ता वाढवणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
यावेळी विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शाळेच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, पोखरण कुसबे सरपंच समीक्षा जाधव,रोटरी क्लब प्रेसिडेंट वर्षा बांदेकर,केंद्रप्रमुख संजय कदम, मुख्याध्यापिका प्रतीक्षा कदम, विश्वनाथ सावंत, अरुण सावंत,सविता सावंत, पंढरीनाथ सावंत, विठोबा सावंत,रवींद्र पांगम, संतोष सावंत,दिया मठकर,सुभाष सावंत, एस. वाय. सावंत, सावंत आदी शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्यामसुंदर सावंत यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स