ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवगड इतिहास संशोधन मंडळ आणि देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारीला  कातळशिल्प सहलीचे आयोजन.

देवगड इतिहास संशोधन मंडळ आणि देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारीला  कातळशिल्प सहलीचे आयोजन.

प्रकाशन: 03 Jan 2023 01:08 PM
वाचन संख्या 260

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या पर्यटन विकासासाठी  एक नवा उपक्रम नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले
आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे
रविवारी ८ जानेवारीला सुरु होणार्या  सहलीची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.

सुरुवात सकाळी ८ वाजता देवगड स्टॅन्ड वरून सुरुवात होईल  वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून पुढे  त्यानंतर बापर्डे येथे वानिवडे, तळेबाजार ,दाभोळे येथील पोखरबांव करून परत देवगडला येईल. या पूर्ण सहलीत १५ ते १८ सुबक कातळ शिल्प पाहायला मिळतील
       या कातळ शिल्प सहलीचे मूल्य 450₹ रुपये ( प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण ) आकारण्यात आले आहे सहलीसाठी इच्छुक सर्वांनी आपली नावे श्री अजित टाककर ,मोबाईल क्रमांक  9689163017 यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो सौजन्य : संग्राहीत गुगल

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स