यंदाच्या वर्षात बदलणार सी.ए.( सनदी लेखापाल) परीक्षेचा अभ्यासक्रम.
ब्युरो न्यूज | पुणे : यंदाच्या वर्षात सनदी लेखापाल (CA) अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यात आता सहा पेपर द्यावे लागणार असून, तंत्रज्ञानही अंतर्भूत करण्यात येणार आहे. त्याशिवाय भारतीय राज्यघटनेचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारत विभागीय परिषदेचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष मुर्तझा काचवाला यांनी माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष यशवंत कासार, खजिनदार पीयुष चांडक, विभागीय समिती सदस्या ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष काशिनाथ पठारे, सदस्य प्रणव आपटे, अमृता कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. त्यापूर्वी डब्ल्यूआयआरसीच्या शिष्टमंडळाने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्तालयात प्रधान मुख्य आयुक्त एस. एम. टाटा,
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)