हॉटेल व्यावसाईक मामा कोरगांवकर यांचे निधन..
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे आणि आंगणेवाडी येथील हॉटेल व्यावसाईक व कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथील सदानंद बापू कोरगांवकर ( ७६ वर्ष) यांचे म्हापसा गोवा येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मामा या टोपण नावाने ते ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. मसुरे शिवसेना विभागप्रमुख राजा कोरगांवकर, कुडाळ येथील सचिन कोरगांवकर व हॉटेल व्यावसाईक नितीन कोरगांवकर यांचे वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)