नांदगावात ई बर्ड एंटरप्राइझेसच्या भव्य शोरुमचे उदघाटन
🔹 प्रथमच सिंधुदुर्गात इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिक्षा व रिक्षा टेम्पो
विवेक परब/ ब्यूरो चिफ– नुकतेच नांदगाव तिठा येथे सिंधुदुर्ग बँकेच्या खाली इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिक्षा आणि रिक्षा टेम्पो यांच्या भव्य शोरूमचे इ बर्ड इंटरप्रायझेसचे उद्घाटन असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. बबन महाडिक, शामसुंदर लोके, सचिन कुबल, प्रसाद मर्गज, साई कुबल, देऊ लोके, श्रीराम मोरजकर, रमाकांत हडकर, सुनिल मोर्ये, मारुती मोर्ये, सद्गुरू कुबल, राजू लोके इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शोरुम मध्ये डिलिव्हरी व्हॅन, फूड कार्ट, हायड्रलिक गारबेज कार्ट, डस्टबिन गारबेज कार्ट, व्हेजिटेबल कार्ट, आईसक्रीम कार्ट अशा विविध प्रकारच्या रिक्षा टेम्पो उपलब्ध आहेत. या सर्व इलेक्ट्रिक रिक्षा सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. तरी सर्व ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन इ बर्ड इंटरप्रायझेसच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)