ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गाव पॅनल पुरस्कृत किरण मेस्त्री यांची बिनविरोध निवड तर उपसरपंच पदी महेश राणे यांची निवड

चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गाव पॅनल पुरस्कृत किरण मेस्त्री यांची बिनविरोध निवड तर उपसरपंच पदी महेश राणे यांची निवड

प्रकाशन: 30 Dec 2022 09:06 PM
वाचन संख्या 125

संतोष साळसकर | शिरगांव : देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गाव पॅनल पुरस्कृत सरपंच पदी किरण लीलाधर मेस्त्री यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महेश बाळाराम राणे यांची निवड झाली आहे चाफेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच सहित सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध सदस्य अनुक्रमे – सौ. सान्वी संजय मेस्त्री, सौ. राधिका राकेश ठूकरुल, सौ प्रतिभा प्रकाश मेस्त्री, सुदर्शन आकाराम साळकर, सौ. मानशी महेश परब, सुनील गोपाळ कांडर हे बिनविरोध निवडून आले. मात्र उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी महेश बाळाराम राणे आणि सुनील गोपाळ कांडर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यात महेश राणे यांना ६ मते तर सुनील कांडर यांना २ मते मिळाल्याने महेश राणे हे विजयी झाले.

यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून एस.पी. गायकवाड, अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामसेवक एम. जी. जळते यांनी काम पाहिले. यावेळी मावळते सरपंच सौ. संचिता भोगले यांनी नूतन सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर इतर सर्व सदस्यांचे ही यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी माजी सरपंच सौ. संचीता भोगले, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मोंडकर, माजी सरपंच संतोष साळसकर, सत्यवान कांडर, पंढरीनाथ कांडर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स