ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आता देशातील  कोणत्याही भागातून मतदान करता येणार ; निवडणूक  प्रक्रियेत बदल करण्याची शक्यता.

आता देशातील कोणत्याही भागातून मतदान करता येणार ; निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची शक्यता.

प्रकाशन: 29 Dec 2022 05:50 PM
वाचन संख्या 218

मुंबई | ब्यूरो न्यूज – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या भारताचा उल्लेख केला जातो. गेल्या ७० वर्षांपासून आपल्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. तसेच ग्रामपंचातीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका नियोजित वेळी होत असतात. या निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आहे. ज्या मतदारसंघात नाव नोंदवलेले असते तेथील मतदान केंद्रात मतदाराला आपल्या मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र बदलत्या काळात अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त आपल्या गाव, शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी बऱ्याचदा त्यांना मतदानासाठी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते.अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे.
आता देशातील कुठल्याही भागातून मतदाराला मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांकडून अभिप्राय मागवले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सुविधेसाठी वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात येत असतात. कोरोनाकाळातही मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने अनेक तरतुदी केल्या होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स