अर्जेंटिनाची गतविजेत्या क्रोएशियाला 'उन दोस स्त्रेज' करत अंतिम फेरीत धडक..!
मालवण | सुयोग पंडित : कतार येथे सुरु असलेल्या (फिफा) ‘फुटबॉल विश्वचषक २०२२’ आता त्याच्या सांगतेकडे आला आहे. काल रात्री उशीरा झालेल्या उपांत्य सामन्यांत अर्जेंटिनाने गत उपविजेत्या क्रोएशियाचा ३-० गोलने धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अर्जेंटीनाची राष्ट्रीय भाषा असलेल्या स्पॅनिश मधील ‘उन दोस स्त्रेज’ म्हणजे एक…दोन…तीन…अशा ३-० गोलच्या फरकाने अर्जेंटीनाची सरशी झाली.
या विजयासह अर्जेंटिनाने ८ वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. विश्वचषकाच्या इतिहासात अर्जेंटिना आता सहाव्यांदा अंतिम फेरीत खेळणार आहे. १८ डिसेंबरला फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या हाफमध्ये क्रोएशियाच्या संघाने आक्रमक सुरुवात केली होती. पण सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पाचव्या मिनिटाला ज्युलिएन अल्वारेजने अफलातून गोल नोंदवला. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने गोलचे ५ प्रयत्न केले तर क्रोएशियाने ४ वेळा गोलचा प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये सर्वाधिक चेंडू क्रोएशियन संघाकडे ६२ % आणि अर्जेंटिनाकडे केवळ ३८ % टक्के होता.
मध्यंतरानंतर अर्जेंटिनाने आणखी एक गोल नोंदवला. ६९ व्या मिनिटाला मेस्सीने अल्वारेजकडे पास टाकला आणि अल्वारेजने कोणतीही चूक न करता गोल केला. अल्वारेझनेही मिळालेल्या संधीचे सोने करत आपला दुसरा तर संघासाठी तिसरा गोल केला. क्रोएशियाच्या संघाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही.
या विजयानंतर मेसीचे चाहते आणि आता अंतिम सामन्यात ‘उन’ म्हणजे प्रथम क्रमांकासाठी आतुर आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)