अमृतलाल परबत गुडका (शाह) यांचे निधन.
मुंबई | प्रतिनिधी : मुंबईतील मुलुंड पूर्वेच्या गव्हाणपाडा येथील रहिवाशी, ज्येष्ठ समाजसेवक अमृतलाल परबत गुडका (शाह) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. दादर विभागातील माजी उपविभागप्रमुख आणि शाह फाउंडेशनचे अध्यक्ष अश्विन शाह यांचे ते वडील होत. हालारी विसा ओसवाल समाजाच्या राहत शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ३.३० वाजता दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके रोडवरील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)