नेरूर गोवेरी भगतवाडी शाळेस गंगाराम सडवेलकर यांचेकडून भेटवस्तू प्रदान..!
सत्य शिवाहून सुंदर हे…!
राकेश परब /कुडाळ : (विशेष वृत्त) चिरा चिरा हा जडवावा कळस कीर्तीचा घडवावा ह्या ओळींचा अर्थ लक्षात घेतला तर कळते की शाळा तथा शिक्षण म्हणले की नुसते ज्ञान,अभ्यास किंवा गुणवत्ता या गोष्टींच आवश्यक असतात असे नाही.शाळेच्या उभारणीनंतरही अनेक गोष्टींची, साधन सामुग्रीची शाळेला व पर्यायाने शिक्षणाला गरज असते. याचीच एक प्रचिती आणि जाणिव उदाहरण नेरुर भगतवाडी येथे घडले आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोवेरी भगतवाडी शाळेस श्री.गणेश सडवेलकर गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगाराम सडवेलकर यांनी दोन स्टील कपाटे भेट स्वरूपात दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी पं.स.सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळी क्रेंदबल गटाचे क्रेंद्रप्रमुख वासुदेव मराठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक शिक्षक संघ सदस्य, प्रशालेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरुन गंगाराम सडवेलकर म्हणाले शाळेच्या सुविधा बाबत शाळेतील सर्व शिक्षक जागृत आहेत.शाळा व्यवस्थापन समिती, पालक ग्रामस्थांच्या वतीने अधिकाअधिक शाळेच्या सुविधा पुर्णत्वास आणाव्यात असे सूचित केले.तसेच भविष्यात अशा काही शालेय सुविधासाठी माझा मदतीची गरज भासल्यास जरुर सांगावे असे सांगितले. ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असल्याने शिक्षकांनाही सडवेलकर यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेच्या वतीने गंगाराम सडवेलकर यांचा शाल श्रीफळ, पुपगुच्छ ,आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्री गणेश सडवेलकर यांना पण वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने भेट वस्तू व अभिष्टचिंतन पत्र देण्यात आले. कार्यक्रम कोरोनो सर्व नियम पाळून संपन्न झाला.
शालेय गरज ओळखून पाऊल उचलणार्या अनोख्या समाजसैनिकाचा आदर्श श्री गणेश सडवेलकर यांनी कृतीतून दाखवून दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)