ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका...!

राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका...!

प्रकाशन: 25 Sep 2021 01:04 PM
वाचन संख्या 181

आमदार वैभव नाईक यांची माहिती

ब्यूरो न्यूज / मुंबई : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी  राज्यमंत्री दीपक केसरकर व आपल्या पाठपुराव्यातुन  सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४  रुग्णवाहिका  वितरित करण्यात आल्या आहेत. यातील ११   रुग्णवाहिका   प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर   कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १ , सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ व  पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १   रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना रुग्णवाहिका देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली होती. ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
        प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी व तळकट, कणकवली तालुक्यातील कनेडी, कुडाळ तालुकयातील कडावल, पणदूर, वालावल, मालवण तालुक्यातील गोळवण, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, सांगेली, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, रेडी  या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना  रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.याआधीही  राज्यसरकाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या. राज्यसरकारकडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, व रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स