ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
देवगड तालुक्यामध्ये झाले वेब मालिकेचे चित्रीकरण

देवगड तालुक्यामध्ये झाले वेब मालिकेचे चित्रीकरण

प्रकाशन: 25 Sep 2021 10:23 AM
वाचन संख्या 100

देवगडचे निसर्ग सौंदर्य भुरळ पाडत आहे चित्रपट निर्मात्यांना: दिग्दर्शक अमित कोळी

ऋत्विक धुरी / देवगड : देवगड तालुक्यात गेले चार ते पाच दिवस देवगडमध्ये वेब मालिकेचे चित्रीकरण चालू होते. पाच भागांची ही वेब मालिका असून ‘१३ डेज ऑफ लव’ असे त्याचे नाव असणार आहे. गणराज प्रोडक्शन या बॅनरखाली ही वेब मालिक बनत असून श्रेयश जाधव हे त्याचे निर्माते आहेत तर, चेतन मुरूमकर यांच्या ए.के. क्रिएशन या प्रोडक्शन टीम च्या माध्यमातून या वेब मालिकेचे चित्रीकरण होत आहे. यामध्ये अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेता राहुल मगदूम, अभिनेता चिन्मय संत, आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तरी यामध्ये काही प्रमाणात मालवणी भाषेचा देखील समावेश असून याच्या निर्मितीसाठी स्थानिक कलाकार राजेंद्र बोडेकर आणि ऋत्विक धुरी यांनीदेखील ए.के. क्रिएशन सोबत या मालिकेच्या निर्मितीसाठी काम पाहिले आहे. दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून ही वेब मालिका छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. दिग्दर्शक अमित कोळी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीची व सामाजिक संदेश देणारी कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी तयार करत असतात. अशाच प्रकारची युवा पिढी वर आधारित ही मराठी वेब मालिका असून एम.एक्स प्लेयर या ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


या वेब मालिकेचे ७० टक्के चित्रीकरण हे देवगड तालुक्यामध्ये झाले असून उर्वरित चित्रीकरण सातारा येथे होणार आहे. कुणकेश्वर, मिठमुंबरी, देवगड, विमलेश्वर, पडवणे अशा देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी भागात याचे चित्रीकरण झाले आहे. तरी देवगडचे निसर्ग सौंदर्य हे चित्रपटसृष्टीसाठी व सर्वच निर्मात्यांसाठी भुरळ पाडणारे असून, भविष्यातही देवगडचा चित्रपट निर्मितीसाठी अधिक विचार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अमित कोळी यांनी व्यक्त केली आहे. तरी या वेब मालिकेची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स