ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांचा माणगांवात करिष्मा ; अवधूत गायचोर, संजय देवळी यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

आमदार वैभव नाईक यांचा माणगांवात करिष्मा ; अवधूत गायचोर, संजय देवळी यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 10 Dec 2022 03:19 PM
वाचन संख्या 136

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माणगांव गायचोरवाडी येथील अवधूत गायचोर आणि देऊळवाडी येथील संजय देवळी यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणूकित शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार प्रवेशकर्त्यांनी केला.

यावेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, रमाकांत ताम्हाणेकर, कौशल जोशी,बंडया कुडतरकर, बापू बागवे,सचिन भिसे, रुपेश धारगळकर,बच्चू नाईक, संदीप सावंत,मनीषा भोसले, डॉ. योगिता राणे, तेजस्वीनी नाईक,अक्षता धुरी, दर्शना पेडणेकर, मनाली धुरी,अनुष्का तेली,प्रीती आडेलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स