पराग खोत यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी निवड.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या’ उपतालुकाप्रमुख पदी निवड झाली. आज दुपारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखा कार्यालयात ही घोषणा झाली.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे,महिला उपजिल्हा संघटक नीलम शिंदे,मालवण महिला उपतालुकाप्रमुख भारती घारकर, संदेश पाटील, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पराग खोत यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)