ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ नगरपंचायतीचा भाजी विक्रेत्यांवरील रेड अलर्ट विरोधात भाजपा नगरसेवक आक्रमक.!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ नगरपंचायतीचा भाजी विक्रेत्यांवरील रेड अलर्ट विरोधात भाजपा नगरसेवक आक्रमक.!

प्रकाशन: 30 Nov 2022 01:49 PM
वाचन संख्या 74

मोहिमेला विरोध नाही परंतु कार्यवाही नियमानुसार करावी अशी भाजपा नगरसेवकांची मागणी.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीने कुडाळात भाजी विक्रेत्यांवर रस्त्याच्या कडेला बसून विक्री करण्यावर तातडीने निर्बंध जाहीर केले. आज बुधवारचा बाजार भरतो हे माहीत असतानाही सूचना देण्यास वेळ न देता कालच्या पत्राने आज तातडीने कारवाईची सुरुवात करण्यात आली. या अचानक मोहिमेमुळे कुडाळ पोलीस स्टेशन परिसरात जे स्थानिक भाजी विक्रेते बसतात त्या ठिकाणी अचानक गोंधळ उडाला आणि विक्रेते असणारे स्थानिक शेतकरी संतप्त झाले. त्यांच्या मदतीला भाजपा नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे,नगरसेवक निलेश परब,नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर धावून गेले आणि प्रशासनाला कारवाई करण्यापासून रोखले. यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. यावेळी ही कारवाई नियमबाह्य असून योग्य पद्धतीने व्हावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. भाजी विक्रेत्यांना हटवण्यासाठी विरोध नाही पण नियमानुसार कारवाई करा अशी मागणी कुडाळ भाजपा नगरसेवकांची यावेळी केली.

कुडाळ नगरपंचायत च्या वतीने स्थानिक भाजी विक्रेत्यांना हटवण्याची मोहीम पोलीस बंदोबस्त सहित नगरपंचायत प्रशासनाने हाती आज रोजी हाती घेतली, त्यावेळी हा प्रकार घडला. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. यापूर्वी सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही न करता, स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा नेमून न देता स्थानिक भाजी विक्रेत्यांना भर बाजाराच्या दिवशी रस्त्यावरून अचानक हटवण्याची कार्यवाही सुरू केली गेल्याने भाजपाचे नगरसेवक इथे चांगलेच आक्रमक झाले. जो पर्यंत सर्वसाधारण सभेत ठरलेल्या सूचना पालन होत नाही तोपर्यंत कोणालाही हटवू नये अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली. यावेळी उडालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे काही काळ त्या परिसरात वातावरण तंग झाले होते.त्यावेळी सतिश कुडाळकर, तसेच स्थानिक भाजी विक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपंचायत अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स