ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
गवळी समाजाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गवळी समाजाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप..!

प्रकाशन: 30 Nov 2022 04:48 PM
वाचन संख्या 126

श्रावण | गणेश चव्हाण : गवळी समाजातील विद्यार्थी हुशार आणि संस्कारक्षम बनावा यासाठी गवळी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नियमित विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून, वेळोवेळी सहकार्य करत असतात. तसेच समाजातील गोरगरीब बांधवांना सहकार्य करत असतात. याची प्रेरणा तुम्ही बालवयात घेऊन चांगला अभ्यास करुन मोठे व्हावे व हे समाजाचे ऋण फेडावे. असे मार्गदर्शन श्रावण गावचे माजी सरपंच व गवळी समाज्याचे ज्येष्ठ सल्लागार अंकुश लाड यांनी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना श्रावण येथे विद्यार्थ्यांना केले.

महाराष्ट्र चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा सिंधुदुर्ग या गवळी समाजाच्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमांत बोलतांना अंकुश लाड पुढे म्हणाले, गवळी समाज एकजुटीचा प्रत्यय आणि आदर्श इतर समाजाने घ्यावा असे गवळी समाजाचे कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालले आहे. गवळी समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य समाज बांधव एकजुटीने काम करताना दिसत आहेत. या समाजामार्फत आपल्या समाजात गवळी समाजातील विद्यार्थ्यांना संघटनेचे नेहमी सहकार्य असते.

यावेळी श्रावणचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय गवळी, प्रमोद गवळी, मंगेश यादव, गवळी समाजाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रसेन लाड, जितेंद्र लाड, प्रतिक चौकेकर, वैभव यादव, चंद्रकांत यादव, सूर्यकांत पंदारे, सुहासिनी पंदारे, महेश गवळी, पत्रकार गणेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पहिली ते दहावी मधील, कु. तन्वी गवळी, कु. प्रतिक्षा चौकेकर, रेवती लाड, अथर्व गवळी, ओमकार लाड, निलज लाड, अर्णव गवळी, वैष्णवी यादव, दुर्वा यादव, मयुरेश यादव, लाड आदी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मंगेश यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स