'मालवणचो कट्टो प्रतिष्ठानच्या' मालवणचो कट्टो प्रिमिअर लीगची घोषणा.
रविवारी ४ डिसेंबरला सकाळी ७:३० पासून रंगणार थरार.
मालवण | सुयोग पंडित : व्यावसायिक मार्गदर्शन व रक्तदानासारख्या व्यापक समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणार्या मालवणचो कट्टो प्रतिष्ठानने क्रिकेट स्पर्धा आयोजीत केली आहे.
मुंबई व मुंबई उपनगर येथील “मालवणचो कट्टो’ प्रतिष्ठान यांच्या सर्व सभासदांसाठी स्व. श्री. प्रमोद महाजन मैदान, टँक रोड, भांडुप पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००७८ येथे रविवारी ०४ डिसेंबर २०२२ सकाळी ७.३० ते ५.०० रोजी “मालवणचो कट्टो” प्रतिष्ठान पुरस्कृत मालवणचो कट्टो प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी मालवणी कोकणी माणसांच्या या अद्भुत क्रीडा व क्रिकेट स्पर्धेला प्रेक्षकांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला शोभा आणावी आणि
सहकारातून सदाचार साधण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा –
सुधीर कांदळकर -९०२२०६१८१२
राम वेंगुर्लेकर -९४०६६७४१२
विशाल पेडणेकर -९४२१७०१०८९
आनंद गावडे – ९७०२०३७८४८
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)