ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शेठ न. म. विद्यालय खारेपाटण ६० वर्षांच्या विद्यार्थ्यांचा स्नेहभेट मेळावा ; तब्बल ४० वर्षानंतर एकत्रित भेट.

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण ६० वर्षांच्या विद्यार्थ्यांचा स्नेहभेट मेळावा ; तब्बल ४० वर्षानंतर एकत्रित भेट.

प्रकाशन: 28 Nov 2022 05:07 PM
वाचन संख्या 613

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयातून १९८२ साली १२ वी परिक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ४० वर्षानंतर स्नेह मेळावा पार पडला. यावेळी इतक्या वर्षानंतर पुन्हा आपले शाळेतील मित्र मैत्रिणी भेटणार या कल्पनेनेच अनेकजण उत्साही होते. दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यात विविध जुन्या आठवणी, सध्याच्या आठवणी याबाबत मनसोक्त चर्चा झाली.

खारेपाटणचे उद्योगमहर्शी दिवंगत दादा ढमाले यांचे सुपुत्र संजय देसाई (ढमाले) यानी काॅलेजच्या नुतनीकरण, विस्तारीकरण व पुढील प्रगतीसाठी माजी विद्यार्थी यांचा संपर्क घडवून आणला. आणि तेथुनच याही वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मित्र-मैत्रिणींना एकमेकांच्या संपर्कासाठीचे वेध लागले, शोधाशोध सुरू झाली. भराभर एकाकडून दुस-याचा, दुस-याकडून तिस-याचा, अशा प्रकारे पाठ-पुरावा करीत बहूतेक जण एकमेकांच्या फोन द्वारे संपर्कात आले.

आज काहीजण आपापल्या उद्योग व्यवसायात, तर काहीजण आपल्या नोकरी क्षेत्रात परिपूर्ण अवस्थेत कार्यरत आहेत. काहीजण प्रत्यक्ष भेटून तर काहीजण व्हाट्स-अॅप व फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात सतत राहीले. आणि तेथूनच एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचे वेध व तळमळ निर्माण झाली. एकमेकांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होत होते.

या अप्रत्यक्ष भेटीतून मिळणारा आनंद प्रत्यक्ष भेटीसाठी खुनावू लागला आणि नडगिवे येथे स्नेह भेटीचे ठरले. प्रत्येकाची एकमेकांच्या भेटीची उत्सुकता दुथडी भरून ओसंडून वाहत होती. मुंबई येथून शेखर देसाई (ढमाले),विजय केसरकर, श्रीरंग कानडे, प्रदीप पाटील, सुनिल गिरकर, नंदिनी शेट्ये,प्रमीला शेट्ये, कल्पना तावडे, चिपळूण येथून दिलीप भाबल,पुणे येथून ज्योती जोग, विजय आंबेरकर,कोल्हापूर येथून शैलजा गोखले, रत्नागिरी येथून सुरेखा देवस्थळी,देवाचे गोठणे येथून मुरारी गोठणकर, कशेळी येथून अनंत सावरे, ओणी येथून दिपक लिंगायत, पाली येथून वृंदा लिंगायत, नडगिवे येथून दिलीप मन्यार, खारेपाटण येथून सुनिल पाटणकर, कुणकवण येथून अशोक गांगण, मणचे येथून वासंती देवस्थळी आणि ज्याना ज्याना शक्य होईल अशा सगळ्यांची स्नेह-भेटीची तयारी झाली. 

आपण ४० वर्षानंतर एकमेकांना प्रत्यक्ष भेटतो आहोत हा जो आनंद ओसंडून वाहत होता तो अवर्णनीय होता. प्रत्येकाचे डोळे एकमेकांचा चेहरा पाहून ओळख पटवण्यासाठी शोधत होते. त्यानंतर एका दालनात ओळख परेडसाठी जमा झाले. प्रत्येकाने आपली ओळख आणि कौटुंबिक जीवनांबद्दल थोडक्यात ओळख करून दिली. येथेच प्रत्येक जण आपले वय विसरून १८/२० वर्षाच्या १२ वी च्या वर्गात त्यावेळच्या आठवणी आणि १२ वी चा प्रवास याबाबत मनमूराद गप्पामध्ये रमले. त्यानंतर काही वेळाने तेथील आजू-बाजूच्या परिसराला धावत्या भेटी झाल्या.

त्यानंतर थोड्या विश्रांती नंतर सायंकाळी खारेपाटण परिसरातील मित्र-मैत्रिणींच्या घरांना धावती भेट झाली. पुन्हा रिसाॅर्टवर येवून रात्री ६० वर्षांच्या मुला-मुलींची अंताक्षरी रंगली, प्रत्येकजण मनमुराद आनंद लुटत होते. काहीनी मित्रांसाठी भेट वस्तू दिल्या, चेह-यावर एकमेकांच्या भेटीचा आनंद खळखळत्या झ-या प्रमाणे ओसंडून वाहत होता. याच वेळी खारेपाटण पंचक्रोशीचे विजय देसाई (ढमाले) यानी या ग्रुप ला सदिच्छा भेट दिली. त्यानीही आम्ही ४० वर्षानंतरही एकमेकांच्या संपर्कात सतत राहीलो म्हणून समाधान व आनंद व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स