ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती.

कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती.

प्रकाशन: 23 Nov 2022 05:28 PM
वाचन संख्या 564

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर.

आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी केले नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन.

मालवण | सुयोग पंडित : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात कुडाळ-मालवण युवती सेना प्रमुख समन्वयक पदी सौ. शिल्पा यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व महिला युवतींना एकसंघ करून विविध उपक्रम राबविणाऱ्या शिल्पा खोत आगामी काळातही युवतींना मुख्य प्रवाहात आणून त्यांना व्यासपीठ मिळवून देत युवतींच्या प्रगतीसाठी निश्चितच आश्वासक कार्य करतील. असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स