ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्ह्यातील मूर्तीकलेच्या निर्मितीपश्चातचे व्यावसायिक प्रसाराचे मूर्त स्वरुप शिकणे गरजेचे : समीर अशोक चांदरकर.

जिल्ह्यातील मूर्तीकलेच्या निर्मितीपश्चातचे व्यावसायिक प्रसाराचे मूर्त स्वरुप शिकणे गरजेचे : समीर अशोक चांदरकर.

प्रकाशन: 23 Nov 2022 07:36 PM
वाचन संख्या 163

समीर अशोक चांदरकर आहेत सुप्रसिद्ध कलावंत व मूर्तीकार .

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : विश्वातील कुठल्याही कलाकृतींची स्पर्धा किंवा प्रदर्शन आपल्याला बरच काही शिकवून जाते. मग ते चित्र प्रदर्शन असेल किंवा मूर्ती प्रदर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलाकारांची खाण आहे. मुळात आपले सण, समारंभ हे कुठल्या ना कुठल्या कलाकृतीशी जोडलेले आहेत. गायन, वादन, चित्रकला,शिल्पकला अशा विविध कला क्षेत्रामध्ये नैपुण्य असलेले हिरे
आपल्या जिल्ह्यात आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तिकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गणेश मूर्ती स्पर्धा व प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाल्याबद्दल समीर चांदरकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. जिल्हाभरातून जवळपास 120 मूर्तीकरांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या प्रदर्शनातील सर्वच कलाकृती ह्या अप्रतिम होत्या. मुळात इथले मूर्तिकार हे कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले मूर्तिकार नाही. आपला परंपरागत व्यवसाय सांभाळत गणेश चतुर्थीच्या अगोदर दोन ते तीन महिने इथल्या गणेश मूर्ती शाळांमध्ये गणपती बनवण्याचे काम चालते. जुन्या जाणत्या कलाकारांकडून कुटुंबातच पुढच्या पिढीच्या हाताला वळण लागतं. त्यामुळे या गणेश मूर्ती शाळाच खऱ्या अर्थाने मूर्ती कलेचे शिक्षण देण्याचे काम करतात. मूर्ती बनवण्याच्या कलेतील परिपूर्ण असलेला इथला कलाकार मार्केटिंगच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे. गणेश चतुर्थीत जवळपास 80 हजार मुर्त्यांचे पूजन आपल्या जिल्ह्यात होते. अलीकडच्या काळात यातील 60 ते 70 टक्के मुर्त्या या इतर ठिकाणाहून आयात केल्या जातात त्यातल्या बहुतेक मुर्त्या या प्लॅस्टर ऑफ पॅरिस असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणीय दृष्ट्या ही बाब अतिशय खेदाची आहे. परंतु कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हव्यासामुळे इथला मूर्तिकारच किंवा व्यावसायिक रेडीमेड मुर्त्या आणून त्या फक्त रंगवून देण्याचं काम करतो.(भविष्यात पूर्ण रंगवलेल्या रेडिमेड मुर्त्या सुद्धा बाजारात उपलब्ध होतील ).त्यामुळे इथला रोजगार टिकवायचा असेल तर मातीच्या, गोमय तसेच लगद्याच्या पर्यावरण पूरक मुर्त्या बनवणारे मूर्तिकार पुढे आले पाहिजेत. मुर्त्यांच्या मार्केटिंग संदर्भातले प्रशिक्षण या मूर्तीकरांना देणे गरजेचे आहे.अनेक चित्रकला,रांगोळी स्पर्धा या प्रत्यक्ष स्वरूपाच्या असतात. ज्या ठिकाणी दिलेल्या वेळेत ती कलाकृती साकारण्याचे बंधन त्या कलाकारावर असते. अशा स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे कलाकार एकत्र येतात. ती केवळ स्पर्धा किंवा प्रदर्शन नसते तर एक प्रकारची कार्यशाळाच असते. ज्या ठिकाणी अनुभवी कलाकाराकडून नवोदित कलाकारांना बरच काही शिकता येते.आपल्या जिल्ह्यातही अशाप्रकारे ऑन द स्पॉट मूर्तिकलेची एखादी स्पर्धा व्हावी जिथे प्रत्यक्ष मूर्तिकार आपल्या कलाकृती साकार करतील . प्रत्येक कलाकाराची काम करण्याची एक विशिष्ट शैली असते. प्रत्यक्ष काम करताना अनेक बारकावे पाहता येतात.त्यामुळे विचारांची पर्यायाने कलेची देवाण-घेवाण होईल. व इथली मूर्ती कला अधिक वृद्धिंगत होईल.भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सारख्या संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा बँक सारख्या संस्था कलाकारांच्या पाठीशी आहेतच. परंतु सर्वच कला प्रकारांसाठी विविध संस्थांच्या मार्फत अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे,स्पर्धा,प्रदर्शने, आयोजित केली तर इथल्या स्थानिक कलाकाराला आपली कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. क्रिकेट स्पर्धांसाठी जो उत्साह इथल्या तरुणांमध्ये दिसतो त्या प्रकारचा उत्साह जरी या कलाप्रकारांसाठी दाखवला तर आपल्या जिल्ह्याची एक वेगळी ओळख भारताच्या नकाशावर दिसेल. जिथे संस्कृती जपली जाते तो प्रदेश नेहमीच प्रगती करतो. या प्रदर्शनामध्ये मूर्तिकला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल समीर चांदरकर यांनी आयोजकांचे धन्यवाद मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स