ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पूर्वा गावडेला खेलो इंडिया वुमन्स जलतरण स्पर्धेत रौप्यपदक.

पूर्वा गावडेला खेलो इंडिया वुमन्स जलतरण स्पर्धेत रौप्यपदक.

प्रकाशन: 23 Nov 2022 01:30 PM
वाचन संख्या 44

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटू आहे पूर्वा गावडे.

ओरोस | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटू कु. पूर्वा संदीप गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश मिळवले असून गुजरात- अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज – २ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे.

जुलै २०२२ महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले होते त्यानंतर १ ऑगस्टला अहमदाबाद येथे झालेल्या १८ वर्षाखालील ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज-१ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता त्याच बरोबर कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारात पाच पदके पटकावली होती त्यानंतर आता पुन्हा अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या राउंड मध्येही पूर्वाने आपला परफॉर्मन्स कायम राखत खेलो इंडिया वूमन्स सिरीज- २ मध्ये ज्युनियर मुलींच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले आहे. तसेच ४०० मीटर फ्री स्टाईल प्रकारातही चौथा क्रमांक पटकावला आहे.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये दहावीच्या शिक्षणा बरोबरच जलतरण चे प्रशिक्षण घेत आहे पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

(फोटो सौजन्य : सिंधुदुर्ग ब्युरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स