ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विहिरीत पडलेल्या स्मॉल इंडियन सिवेट कॅटची वनविभागाकडून सुटका...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विहिरीत पडलेल्या स्मॉल इंडियन सिवेट कॅटची वनविभागाकडून सुटका...!

प्रकाशन: 22 Oct 2022 09:36 PM
वाचन संख्या 100

मसुरे | प्रतिनिधी :

कुडाळ तालुक्यातील मौजे पिंगुळी येथे विहीरी मध्ये पडलेल्या वन्यप्राणी स्मॉल इंडियन सिवेट कॅट/वाघाटीची सुखरूप सुटका शनिवारी करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पूजा वालावलकर यांचेकडून वनविभागास माहिती मिळ्ताच वनपरिक्षेत्र कुडाळचे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत 15 ते http://localhost/news/public/uploads/20 फूट खोल विहिरीतून वन्यप्राणी स्मॉल इंडियन सिवेट कॅट/वाघाटी यास सुखरूप बाहेर काढले.
स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यप्राणी स्मॉल इंडियन सिवेट कॅट/वाघाटी चा जीव वाचवता आला त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
रेस्क्यू करण्यात आलेल्या वन्यप्राणी स्मॉल इंडियन सिवेट कॅट/वाघाटी ची वैद्यकीय तपासणी श्री. विद्याधर ठाकूर सहा.आयुक्त पशुसंवर्धन,कुडाळ यांचेकडून करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदर वन्यप्राणी स्मॉल इंडियन सिवेट कॅट/वाघाटी चे रेस्क्यु उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री .एस एन रेड्डी व प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, वनपाल नेरूर धुळु कोळेकर, वनपाल मठ सावळा कांबळे , यशवंत कदम,वनमजूर नेरूर ,राहुल मयेकर वाहन चालक यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स