सागर सावंत मित्रमंडळ पुरस्कृत आमची वाडी देऊळवाडी आयोजित भव्य खुली नरकासुर स्पर्धा..!
बांदा | राकेश परब : बांदा येथील आमचीवाडी देऊळवाडी मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने नरक चतुर्दशी निमित्त रविवार २३ ऑक्टोबरला भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ८ ते १० वाजता ही स्पर्धा श्री देव बांदेश्वर मंदिर जवळ संपन्न होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १००००, ५०००, २००० रुपये रोख व चतुर्थी व पाचव्या क्रमांक विजेत्यांना प्रत्येकी १००० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी गुरुनाथ साळगावकर (मो. ८९५६९८३५४४) किंवा आशिष सावंत (मो. ७०५८३२२७०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)