कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश.
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश.
अनेक पक्षप्रवेश 'वेटींग'वर असल्याचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे विशेष स्पष्टीकरण.
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्याने प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी व सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रवेशकर्ते उपस्थित होते. आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी संबोधित करताना आमदार निलेश राणे यांनी कांदळगावाचे देव रामेश्वर हे राणे कुटुंबियांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले. खासदार नारायणराव राणे यांच्या भाषणातील श्री देव रामेश्वर यांच्या नियमीत उल्लेखाचा त्यांनी आवर्जून दाखला दिला. आमदार निलेश राणे यांनी श्री रामेश्वर देवतेची कृपा आणि सिंधुदुर्गातील जनतेचे आशीर्वादांची सदैव सोबत असल्यचे सांगत सिंधुदुर्गातील जनतेच्या सेवेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित असल्याचे विशेष नमूद केले. आमदार निलेश राणे यांनी मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकास साधणे हेच त्यांचे प्रमुख ध्येय आहे असे सांगताना विकासकामांच्या झंझावाताच्या सातत्यासह कोणत्याही विकासकामासाठी निधीची कमतरता भासू न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी कांदळगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी व सहकारी यांच्यासह हडी व कोळंब गावांतील अनेक ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
प्रवेशकर्ते तथा कांदळगावचे सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम व प्रवेशकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांचा झंझावात तसेच रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रवेश केला असल्याचे सांगितले. गावातील साळकरवाडी ते राणेवाडी बंधारा कम रस्ता उभारणी झाल्यास शेती, पर्यटन व रोजगार निर्मितीतून
गांव अधिक समृद्ध होईल असे सरपंच रणजित परब यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायतला अधिक शासकीय जागा उपलब्ध झाल्यास बहुउद्देशीय इमारत क्रीडांगण उभारणी करून रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. यासह युवकांना रोजगार व अन्य विकास कामाबाबत सरपंच यांनी भूमिका मांडली. आमदार निलेश राणे यांनी सर्व विकासकामे मार्गी लावली जातील असे सांगितले. तसेच बंधारा उभारणी बाबत अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून अंदाजपत्रक ही तयार करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करतं शासन स्तरावरून लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ग्रामपंचायतला आवश्यक असणारी अधिक जागाही उपलब्ध करून दिली जाईल. येथील बचत गटांना आवश्यक असणारा हॉल उभारणीही होईल. गावातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील असेही आमदार निलेश राणे यांनी कांदळगांव वासियांना अभिवनचन दिले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, विश्वास गांवकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर प्रमुख राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, पस सदस्य गणेश तोंडवळकर, विभागप्रमुख संतोष पालव, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, बाबू राणे, संतोष पारकर, माजी सरपंच उमदी परब, ग्रापं सदस्य शारदा मूळये, उमेश कोदे, विहार कोदे, राजेंद्र कदम, आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, जय परुळेकर, युवासेना माजी जिल्हाप्रमुख उद्योजक संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, राजेश गांवकर, मनोज हडकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक यांसह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन कदम यांनी केले.
कांदळगाव-हडी व कोळंब मधील प्रवेशकर्त्यांमध्ये कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम, सदस्य अनघा कदम यांसह सुशांत कांदळकर, संदीप परब, प्रणित परब, केशव परब, अक्षय परब, प्रथमेश परब, सत्कार पाटकर, रुपेश लाड, दिवेश परब, तुकाराम परब, रोहित परब, आनंद पाटकर, नंदकिशोर परब, स्वप्नील परब, उमेश परब, तुकाराम लाड, प्राजक्ता परब, काजल परब, सुचिता पाटकर, हर्षदा पाटकर, वैशाली परब, राजश्री लाड, प्रमिला लाड, राज साटम, प्रिती परब, श्रद्धा परब, रोहिणी परब, छाया परब, प्रणय परब यासह अनेकांचा समावेश आहे. तसेच हडी लाडवाडी येथील सचिन लाड, सुनंदा लाड, प्रशांत लाड, प्रतिक्षा लाड, ओंकार काशीद, सुंदर लाड, सुगंधी लाड, सुनिल लाड, स्मिता लाड, महेश लाड, मीनल लाड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कोळंब येथील युवा कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
आमदार निलेश राणे हे विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन असणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले हक्काचे नेतृत्व आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची असलेली तत्परता, जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत त्यांचा घुमणारा आवाज, विकासकामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सर्वसामान्यांशी जपलेली नाळ यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळत असल्याचे शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीची विशेष प्रशंसा करताना
आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका, विकासाचे व्हिजन व दूरदृष्टी तसेच विधानसभेतील अभ्यासू भाषणे व आग्रही भूमिका पाहता सर्वांनाच आमदार निलेश राणे यांची भुरळ पडली आहे असे सांगितले. माजी आमदार वैभव नाईक यांचा दहा वर्षातील अपयशी कार्यकाळ जनतेसमोर आला आहे. शिवसेनेत मोठया संख्येने पक्षप्रवेश होत आहेत. उबाठा गटाला गळती लागली असून अनेक प्रक्ष प्रवेश 'वेटिंग'वर असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, की...
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू.नगरा...