दशावतारी कलेतील श्री.शांती कलिंगण कालवश ; दशावतार व मराठी नाट्यक्षेत्रात हळहळ.
अतिशय लहान वयात रसिकांच्या मनात मिळवले होते सन्मानाचे स्थान..!
कुडाळ । ब्युरो न्यूज : कोकणच्या पारंपरिक दशावतार कला क्षेत्रात आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले ओंकार रामचंद्र कलिंगण उर्फ शांती कलिंगण (वय ३०) यांचे आज अल्पशा आजाराने गोवा येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
दशावतार कलेतील एक विनोदी आणि रसिक मायबाप प्रेक्षकांची मन जिंकलेला हा धाडसी कलाकार शांती कलिंगण दशावतारी नाटकांमध्ये विनोदी आशयाचे खलनायक अप्रतिम पद्धतीने साकारत असे. त्यांच्या निधनाने दशावतारी कलेचे मोठे नुकसान झाले आहे. शांती कलिंगण हे दशावतारी नटसम्राट कै. सुधीर कलिंगण यांचे पुतणे तर दशावतारी कलाकार आबा कलिंगण यांचे बंधू होत. तर दशावताराचे भीष्माचार्य बाबी कलिंगण यांचे ते नातू होत. शांती यांनी ब्रम्हराक्षस, जंबू राक्षस, रावण, गरुड, शेषनाग या भूमिका साकारल्या होत्या.
श्री शांती कलिंगण यांच्या निधनाने कोकणतात व मराठी नाट्यसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)