ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आजपासून सोनी मराठी वाहिनीवर छोट्या 'बयो'च्या मोठ्ठ्या स्वप्नांची गगनभरारी..!

आजपासून सोनी मराठी वाहिनीवर छोट्या 'बयो'च्या मोठ्ठ्या स्वप्नांची गगनभरारी..!

प्रकाशन: 12 Sep 2022 01:45 PM
वाचन संख्या 221

आजपासून रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर…!

नेरुरवासियांनी केले समस्त मराठी व मालवणी रसिकांना आवाहन.

कुडाळ-नेरूर । देवेंद्र गावडे (उपसंपादक) : कोकणचे निसर्ग सौंदर्य भल्या भल्यांना भुरळ पाडते. त्यात मग मराठी-हिंदी मनोरंजन सृष्टीचाही समावेश आहे व आता तो वाढत जात आहे.
अलिकडच्या काळात मालिका-चित्रपटांसाठी ‘स्पाॅट’ निश्चित करता करता इथल्या ‘गुणवत्ते’वर देखील या सिनेसृष्टीने आपलं लक्ष केंद्रित केले आणि इथली गुणवत्ता झळाझून निघाली.


नेरूरसारख्या ग्रामीण भागातील पण तरीही ग्रामदैवत श्री देव कलेश्वराचा वरदहस्त घेऊन वाटचाल करणा-या अनेक दिग्गज कलावंतांनी मराठी-हिंदी सिने-नाट्यसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवला.
आता मात्र त्यावर कळस चढवलाय तो बालकलाकार कु. रूची संजय नेरूरकर या गुणी बाल अभिनेत्रीने अर्थात् सर्वांच्या लाडक्या ‘बयो’ने..!

सोनी मराठीसारख्या मोठ्या चॅनेलवरून प्रसारीत होणा-या ‘बयो’ या मालिकेसाठी तिची प्रमुख भुमिकेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिचे आई-वडील, गुरूजन, हितचिंतक, मार्गदर्शक इत्यादिंच बहुमोल योगदान लाभले.
कु. रूची ही अत्यंत गुणी व मेहनती मुलगी आहे. ती या भुमिकेला निश्चितच न्याय देईल तिला जाणणार्या कला रसिकांची खात्री आहे.

‘छोट्या बयोची..मोठ्ठी स्वप्नं..’, टॅगलाईन घेऊन सुरू होणारी ही मराठी मालिका सोनी मराठी चॅनेलवर आज सोमवार दिनांक १२ सप्टेंबर २०२२ पासून रात्रौ ८.३० वाजता सुरू होत आहे.
या मालिकेच्या शुभारंभासाठी नेरूरवासियांकडून तसेच विविध स्तरांमधून छोट्या बयोवर कु. रूची संजय नेरूरकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सर्व मराठी,मालवणी रसिक प्रेक्षकांनी ही मालिका आवर्जून पहावी व आपली कौतुकाची थाप आमच्या छोट्या बयोला मिळावी अशा भावना व प्रेमळ आवाहन नेरुरवासीय करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स