भराडी मंदिरच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला…!
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कसाल मार्गावरील चौके येथील ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिरातील दानपेटी शनिवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यानी फोडून हजारो रुपयांवर डल्ला मारला. शनिवारी सायंकाळी गणेश विसर्जन असल्याने मंदिरात कोणी नसल्याने रात्री 8.30 च्या दरम्यान दोन सराईत चोरटे मंदिराच्या उजवीकडील मागील दरवाजाने मंदिरात प्रवेश करत आतमध्ये आले. दोन्ही चोरट्यांनी रेनकोट परिधान केला होता व चेहरा पूर्णपणे रुमालाने बांधला होता.
कटावणीच्या सहाय्याने दानपेटीची असलेली तीनही कुलुपे फोडून रोख रकमेवर डल्ला मारला. चतुर्थी सणात चाकरमानी तसेच भक्त मंडळीनी देवीला दिलेले हजारो रुपये दान चोरट्यांनी मोठ्या शिताफीने चोरून नेले. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस असल्याने मंदिरात रात्री कोणी आले नव्हते त्यामुळे रविवारी सकाळी सदर घटना निदर्शनास आली . संबंधित गावकर मंडळींनी याबाबत मालवण पोलिसांना कल्पना दिली.
त्यानंतर मालवण पोलीसानी सदर चोरीची तसेच मंदिरात बसवलेल्या सी सी टिव्ही फूटेज ची पहाणी केली. यात दोन संशयीत चोरटे दिसून आले. या घटनेचा अधिक तपास मालवण पो. नि. विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)