ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळच्या 'सिंधुदुर्ग राजाचे' विसर्जन…!

कुडाळच्या 'सिंधुदुर्ग राजाचे' विसर्जन…!

प्रकाशन: 09 Sep 2022 09:18 PM
वाचन संख्या 63

सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भक्तीपूर्ण उत्साहाने केले ‘सिंधुदुर्ग राजाच्या’ विसर्जन सोहळ्याचे आयोजन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : माजी खासदार डाॅ. निलेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे परिवाराच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणुक उत्साहाने संपन्न झाली.


गेली दहा दिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. विविध सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राजाच्या दरबारात घेण्यात आले. आज कुडाळ पोस्ट ऑफिस म्हणजेच सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडप इथून सुरवात झाली. कुडाळ पोस्ट ऑफिस, जिजामाता चौक, गांधी चौक मार्ग भैरवाडी, काळप नका ते पावशी तलावापर्यंत पर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजीसह पार पडली
सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान, कुडाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एक आज उत्साह होता.
सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते राजाची उत्तर पूजा सिंधुदुर्ग राजाच्या सभामंडपात संपन्न झाली. पावशी येथील तलाव ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन झाले.
त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्या तेरसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते, ता. अध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, संदीप मेस्त्री, दामू तोडणकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, ॲड.राजीव कुडाळकर, निलेश परब, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, कु.चांदणी कांबळी, विश्वस्त राकेश नेमळेकर, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनिल बांदेकर, सौ साक्षी सावंत, रेखा काणेकर, नागेश नेमळेकर, रुपेश बिडये, साईनाथ म्हाडदळकर, राजवीर पाटील, मुना दळवी, चंदन कांबळी, साईनाथ दळवी, स्वरूप वाळके, प्रथमेश कुडाळकर, आकाश पिंगुळकर, प्रथमेश परब, संदेश सुकळवाडकर, अक्षय बाईत, आनंद सूर्यवंशी फोटोग्राफर धनंजय पानवलकर, कुडाळकर सह सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स