ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भारत गॅसचे गोडाऊन किपर बुलाजी उर्फ भाई चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू ..!

भारत गॅसचे गोडाऊन किपर बुलाजी उर्फ भाई चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू ..!

प्रकाशन: 09 Sep 2022 04:42 PM
वाचन संख्या 349

कोळंब ग्रामपंचायत सदस्य यशवंत चव्हाण यांचे ते बंधू होत.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळच्या कातवडचे रहिवासी आणि मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे खैदा येथील भारत गॅस गोडाऊन या ठिकाणी गोडाऊन किपर असलेले बुलाजी ऊर्फ भाई चंद्रकांत चव्हाण (वय ४०) यांच्या अंगावर लोखंडी गेट पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास गॅस गोडाऊन ठिकाणी घडली.

बुलाजी चव्हाण हे गेली अनेक वर्षे त्या ठिकाणी कामास होते. गुरुवारी रात्री गोडाऊन कंपाऊंडचे लोखंडी गेट बंद करीत असताना लोखंडी गेट त्याचे अंगावर पडून गेट व कातळ भाग यात पडून त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याबाबत संस्थेचे व्यवस्थापक दिनेश पांडुरंग ढोलम यांनी रात्री मालवण पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली.
श्री. बुलाजी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी दाकल झाले. काही काळ तिथले वातावरण संवेदना बनले होते. दरम्यान तिथे पोलीसही दाखल झाले होते. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने तात्काळ ५ लाख मदत देण्याचे लेखी पत्र नातेवाईकांना देण्यात आले अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

कै.बुलाजी यांच्या अकाली मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना भजनाची आवड होती. परिसरात भाई बुवा म्हणून ते ओळखले जात. गावातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. कोळंब ग्रामपंचायत सदस्य यशवंत चव्हाण यांचे ते बंधू होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स