ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भक्तीची वैभवशाली भेट.( विशेष)

भक्तीची वैभवशाली भेट.( विशेष)

प्रकाशन: 29 Aug 2022 07:44 PM
वाचन संख्या 177

दरवर्षी सर्वसामान्यांना मांगल्याच्या भेटी देणारे आमदार वैभव नाईक .

मालवण | सुयोग पंडित (विशेष) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवानिमित्त कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेच्या विविध साहित्याची भेट दिली आहे.
यामध्ये अगरबत्ती, तेल, कापूर, खडीसाखर,गणपती कॅलेंडर , पिशवी हे साहित्य भेट स्वरूपात देण्यात येत आहे. मोठ्या उत्साहात या साहित्याचे वाटप सुरु करण्यात आले असून चिमुकल्या मुली, मुले देखील यात सहभागी होऊन घरोघरी साहित्य पोच करीत आहेत.

गेली अनेक वर्षे आमदार वैभव नाईक भक्तिभावाने आवडीने हे विविध साहित्य भेट देत आहेत.आमदार वैभव नाईक यांनी दिलेली हि प्रेमाची भेट कुडाळ मालवण तालुक्यात प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शिवसैनिक मेहनत घेत आहेत. रात्र रात्र जागून कार्यकर्ते हे साहित्य पिशव्यांमध्ये पॅक करून घराघरात पोहचवत आहेत.

खरेतर या सर्व पूजा साहित्यातील छोट्या छोट्या पण अत्यावश्यक वस्तू. यांतील प्रत्येकाचा सुगंध हा निरामय आणि सात्विक. आमदार वैभव नाईक यांनी हाच सुगंध यथाशक्ती प्रत्येकाच्या जीवनात द्यायचा त्यांचा प्रतिवर्षीचा सुप्रघात सुरु ठेवल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स