ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खासदार राऊत कडाडले....!

खासदार राऊत कडाडले....!

प्रकाशन: 29 Aug 2022 07:15 PM
वाचन संख्या 88

लाचार गद्दांराना आता शिवसैनिक अद्दल घडवून धडा देणार अशी गर्जना.

कनेडी येथे शिवसेना विभागीय शाखेचे उद्घाटन ; आमदार वैभव नाईक विशेष उपस्थित .

उपनेते गौरीशंकर खोत, आ. वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर,संजय पडते,बाळा गावडे,नीलम पालव यांची उपस्थिती

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : कणखर अशा सह्याद्री पट्ट्यातील मावळा हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. कोकणातील हा मावळा शिवसेनेमुळे वेगवेगळ्या पदावर पोचला. मात्र, काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा शिवसेनेच्या लोकांनी दाखवलेली आहे. आताही तीच परिस्थिती राहील. केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी आर्थिक प्रलोभन दाखवून शिवसेना संपवण्याचा विडा उचलला अशा या सत्तेसाठी लाचार झालेल्यांना धडा शिकवूया असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी कनेडी येथे बोलताना व्यक्त केला. शिवसेनेच्या नाटळ सांगवे हरकुळ बुद्रुक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा महिला प्रमुख नीलम पालव यांच्या उपस्थितीत  झाले. विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण पूजेचे ही आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून कनेडी परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यकत्यानी हजेरी लागली होती. परिसर भगवामय करून सोडला होता. ढोल ताशाच्या गजरात खासदार श्री. राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
         खा.  विनायक राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर लोकांना  विश्वास आहे. त्यामुळेच या भागातील अनेक प्रश्न आम्ही गेल्या पाच वर्षात सोडवू शकलो. नरडवे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  कुंभवडे धरणाचे  कामही पुढच्या वर्षी पूर्ण होईल. त्यामुळे या भागात सिंचन क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम होईल. या भागामध्ये चुकीच्या पद्धतीने विकास कामे सुरू आहेत. कामे आम्ही करायचे आणि श्रेय त्यांनी लुटायचे अशी स्थिती आहे. नाटळ मल्हार पुलासाठी आम्ही तातडीने निधी मिळवून दिला. म्हणून यंदा हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला. अशी अनेक विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून या भागांमध्ये झालेली आहे. मात्र, विकास कामे न करात केवळ सरकारी पैसा ठेकेदारीने लुटायचा. त्यांना आम्ही वेळोवेळ त्यांची जागा दाखवून दिली आहे. हा भाग १९९० पूर्वी ही शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आजही तो बालेकिल्ला अभेद आहे. हे आजच्या उपस्थितीवरून मला दिसून आले. असे सांगत खा. राऊत यांनी सर्वांचे कौतुक केले. 


         आमदार नाईक म्हणाले, या भागामध्ये शिवसेनेची सत्ता कायम होती. यापुढेही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायतची सत्ता शिवसेना मिळवले यात शंका नाही. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास शिवसेनेच्या माध्यमातून यापूर्वी झालेला आहे. असाच तो चालू राहणार आहे. इथला शिवसेनेचा कार्यकर्ता नेहमीच पक्षाच्या बाजूने राहिला आहे. तो कुठल्याही दबावाला बळी पडलेला नाही. असे सांगत कार्यकर्त्यांचे  कौतुक केले.

     गौरीशंकर खोत म्हणाले, या भागांमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही १९९० पूर्वी प्रयत्न केला. जुने शिवसैनिक आजही आमच्या सोबत आहेत. ते कायम राहतील. पक्षाच्या माध्यमातून येथील अनेक विकास कामे झाली आहेत. पण, काही लोक अंगावर येण्याचा प्रयत्न करतात त्यांना शिंगावर घेण्याची ताकद आमच्या मध्ये आहे. 
       सतीश सावंत यांनी या भागातील बेनामी ठेकेदारी मोडीत काढायची आहे. कानेडी पंचक्रोशी साठी पहिले शिवसेना विभागीय कार्यालय आम्ही सुरू केले. त्यासाठी इथल्या मंडळींनी जागा दिली. मात्र, ही जागा भाजपच्या काही लोकांनी बळकवून घेतली. ती जागा लवकरच आम्ही ताब्यात घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
          संदेश पारकर यांनी शिवसेनेच्या वाटचालीबाबत माहिती देऊन राज्यात यापुढे शिवसेनेची सत्ता असेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संजय पडते यांनी शिवसेना संघटना  वाढविण्याच्या दृष्टीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.
      यावेळी शिवसेना  तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, अँड हर्षद गावडे, बाळा भिसे, युवासेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके,विभाग प्रमुख आनंद आचरेकर, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, भिरवंडे सेवा सोसायटीचे चेअरमन बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, बंडू ठाकूर, मंगेश सावंत, अंजली सापळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला  यावेळी मान्यवरांचे स्वागत तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आनंद आचरेकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स