ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भास्कर गावडे यांची नेरूरच्या तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्षपदी नियुक्ती..!!</em>

<em>ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भास्कर गावडे यांची नेरूरच्या तंटामुक्त ग्रामसमिती अध्यक्षपदी नियुक्ती..!!</em>

प्रकाशन: 27 Aug 2022 12:15 PM
वाचन संख्या 178

नेरूर । देवेंद्र गावडे
शनिवार । २७ ऑगस्ट २०२२

कुडाळ तालुक्यातील नेरूर गावामधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. भास्कर गावडे यांची गुरूवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तंटामुक्त ग्रामसमितीच्या अध्यक्षपदी गेली सोळा वर्षे ते कार्यरत आहेत.

त्यांच्या या प्रदिर्घ कारकिर्दीमध्ये नेरूर गावाला ‘तंटामुक्त गाव’ म्हणून देण्यात येणारा वर्ष २०१३ मधील पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.

Article image

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गावातील सर्वाधिक तंटे यशस्विरित्या निकाली काढण्यात आल्याबद्धल देण्यात येणारा शासनाचा सात लाख रूपये स्वरूपाचा पुरस्कार देखील नेरूर गावाला श्री. भास्कर गावडे अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये प्राप्त झाला आहे.

अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामूळे काही काळ ते वेळ देऊ शकत नसल्याने अध्यक्षपदापासून दूर होते. परंतू ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी हा पदभार पून्हा स्विकारला आहे.

यावेळी नेरूर गावचे सरपंच, पोलीस पाटील, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

नेरूर ग्रामस्थांमधून याविषयी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स