मसुरे कावावाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे कावातर रस्त्यावर गडघेरावाडी नाका ते कावातर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी खड्यांचा अंदाज न आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. बांधकाम विभागाचे याबाबत लक्ष वेधून सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने वाहन चालक व पादचारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी तरी हा रस्ता खड्डे मुक्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तात्या हिंडळेकर यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)