ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत.</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत.</em>

प्रकाशन: 01 Aug 2022 08:29 PM
वाचन संख्या 85

क्रेनद्वारे फुलांचा हार घालून शुभेच्छांचा केला वर्षाव..!

आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुडाळात शिवसैनिकांचा जनसागर…!

मालवण | सुयोग पंडित :
निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले. चिपी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर,पिंगुळी तिठा मार्गे कुडाळ येथील शिवसेना शाखेला त्यांनी भेट दिली. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुडाळ येथे शिवसैनिकांचा जनसागर लोटला होता.यावेळी क्रेनच्या सहाय्याने फुलांचा भला मोठा हार घालून आदित्य ठाकरे यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांनी हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. शिवसेना जिंदाबाद,बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गद्दार आमदारांचा समाचार घेत शिवसैनिकांना संबोधित केले.

यावेळी खासदार विनायक राऊत,सिने अभिनेते आदेश बांदेकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजन साळवी,आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, माजी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट,युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू,राजू राठोड,सुशील चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, राजन नाईक, नागेंद्र परब, संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव,राजू कविटकर, बाबी जोगी, संतोष शिरसाट, कृष्णा धुरी,योगेश धुरी, रुपेश पावसकर, अतुल बंगे, महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये,किरण शिंदे , उदय मांजरेकर, श्रेया परब, स्नेहा दळवी,मथुरा राऊळ ज्योती जळवी, श्रुती वर्दम,श्रेया गवंडे, सई काळप,नितीन सावंत, संजय भोगटे, सचिन काळप, राजू गवंडे, कृष्णा तेली, संदीप म्हाडेश्वर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स