ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांचा ओरोस येथे जिल्हाधिकारी के .मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते महसूल दिनी विशेष गौरव….!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांचा ओरोस येथे जिल्हाधिकारी के .मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते महसूल दिनी विशेष गौरव….!</em>

प्रकाशन: 01 Aug 2022 09:31 PM
वाचन संख्या 41

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांचा सोमवारी महसूल दिनी ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुहास चव्हाण यांना मानपत्र, गौरव चिन्ह, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
शासन स्तरावरील अनेक योजना तळागाळापर्यंत राबविणे, सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या पोहचवणे. आपत्ती काळात सेवा बजावणे. निवडणूक काळात जबाबदारी पूर्वक काम करणे. कमी स्टाफ संख्या असतानाही जबाबदारी घेऊन चांगले काम करणे, कोरोना काळात, तोक्ते वादळातही चांगले काम करणे, मसुरे मंडळ कार्यक्षेत्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन आदर्श असे काम करणे, अशा विविध चांगल्या कामाची दखल महसूल विभागाने घेऊन मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचा यावेळी गौरव केला. या वेळीअप्पर जिल्हाधिकारी श्री शंकर बर्गे, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग वर्षा शिंगण,श्री मठपती, आणि महसूल चे अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी श्री सुहास चव्हाण यांच्या कार्याचा विशेष गौरव करताना सुनील चव्हाण म्हणजे विभागाचे खरे हिरे असल्याचे गौरवोदगार काढले.
मसुरे मंडल अधिकारी श्री चव्हाण यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल मसुरे सहित सर्व स्तरातून त्यांच्या वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स