'स्वराज्य महोत्सव' उपक्रमांतर्गत डामरे -तिवरे केंद्रात विविध स्पर्धा संपन्न..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
केंद्रबलगट डामरे तिवरेच्या वतीने स्वराज्य महोत्सव अंतर्गत केंद्रस्तरीय निबंध, चित्रकला,व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जि. प. शाळा करूळ या ठिकाणी करण्यात आले. केंद्रप्रमुख श्रीम.जुहिली सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून हा ‘स्वातंत्र्यदिन’आम्हा सर्वांसाठी विशेष आहे. स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी केलेला संघर्ष, देशभक्त क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख बालकांस व्हावी व त्यांच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावे.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.या निमित्ताने सर्व मुख्याध्यापकांचे विद्यांजली प्रशिक्षण संपन्न झाले.तंत्रस्नेही शिक्षक श्री.सुनिल कदम व अभिजित राणे यांनी याबाबतचे मार्गदर्शन केले.
केंद्रस्तरावर विजेत्या स्पर्धकांचे केंद्रप्रमुखांच्या हस्ते पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.पटनोंदणी पुरस्कार विजेत्या सौ. सुनिता मुसळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. विनिता पाटील तर आभार सौ. राणे यांनी मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)