<em>निष्ठा यात्रेनिमित्त युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १ ऑगस्टला सिंधुदुर्गात.</em>
शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांची माहिती..
कुडाळ | देवेंद्र गावडे :
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ ला निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर १२ वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)