ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सावंतवाडी येथील सेवेरीना गॅब्रीअल डिसोज़ा कालवश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सावंतवाडी येथील सेवेरीना गॅब्रीअल डिसोज़ा कालवश.

प्रकाशन: 30 Jul 2022 03:30 AM
वाचन संख्या 257

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक सौ.फिलोमीना पंडित यांच्या आई होत.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरातील न्यू खासकील वाडा येथील ज्येष्ठ नागरीक सेवेरीना गॅब्रीअल डिसोज़ा ( 82 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आज पहाटे 01:00 वाजल्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सावंतवाडी व न्यू खासकीलवाडा परिसरांतील एक अतिशय मदतशील व हसतमुख व्यक्तीमत्व तथा ‘माय’ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

सेवेरीना यांच्या पश्चात दोन मुली , एक सून,सात नातवंडे,पणतवंड आणि दोन जावई असा मोठा परिवार आहे.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या मुख्य संचालक व मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका सौ. फिलोमीना पंडित यांच्या त्या मातोश्री असून आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहाचे संस्थापक व मुख्य संपादक सुयोग पंडित यांच्या त्या सासूबाई व सहिष्णू पंडित यांच्या त्या आजी होत.
सेवेरीना गॅब्रीअल डिसोज़ा यांच्या निधनाने सावंतवाडी मालवण व जिल्ह्यातील सर्वच स्तरांतून शोक व्यक्त होत आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स