<em>सावंतवाडीत बबन साळगावकर यांनी केला आमदार वैभव नाईक यांचा गौरव…!</em>
मालवण | सहिष्णू पंडित :
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आमदार वैभव नाईक यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल पुस्तक भेट देत आमदार वैभव नाईक यांचा गौरव केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांच्यासारखे सामान्य शिवसैनिक आज शिवसेनेच्या कठीण काळात शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे निश्चितपणे सिंधुदुर्गातील शिवसैनिकांना बळ येईल. निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे येत असून त्यांचे स्वागत आपण स्वतः करणार असल्याचेही बबन साळगावकर यांनी यावेळी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)