ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
लोकपरंपरा व निसर्ग संवर्धनाचा संदेश देत आपल्या लाडक्या बाप्पाला अनोखी वंदना..लोकबाप्पा..!!( विशेष वृत्त)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

लोकपरंपरा व निसर्ग संवर्धनाचा संदेश देत आपल्या लाडक्या बाप्पाला अनोखी वंदना..लोकबाप्पा..!!( विशेष वृत्त)

प्रकाशन: 23 Jul 2022 07:34 PM
वाचन संख्या 174

नेरूर येथे पार पडले या अनोख्या उपक्रमाचे सुरेख चित्रिकरण..

लवकरचं येत आहे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला..

नेरूर । देवेंद्र गावडे
शनिवार । २३ जुलै २०२२

गेल्या अनेक वर्षांपासून उत्सवांचे रूपांतर हे इव्हेंटमध्ये झालेलं आपल्याला पहायला मिळते. खरतर कुठलाही उत्सव साजरा करताना त्यातील आनंद वाटून घेऊन आपल्याला एक सामाजिक भान राखून आपण एक मनुष्य म्हणून कसे परिपूर्ण आहोत हे सांगण्यासाठी आणि ते एकमेकांना जाणवून देण्यासाठी खरतर हे उत्सव साजरे केले जातात. परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये ह्या इव्हेंटच्या रूपांतराने आपल्यातला असणाऱ्या माणूसपणाचा, लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्रातील लोकपरंपरेचा आपल्याला विसर पडत चालला आहे. हा विसर पडू नये व पुन्हा एकदा आपली लोकसंस्कृती, लोककलांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

कोकणातील दशावतार, जव्हार-मोखाडा मधील वारली, दोडामार्ग मधील चपई, पिंगुळी येथील ठाकर समाजातील चित्रकथी-कळसूत्री, घाटमाथ्यावरील तमाशा किंवा विदर्भातील झाडीपट्टी अशा विविध लोककलावंतांना एकाछताखाली आणून आपल्या सर्व विघ्नांना हरण करण्यासाठी विघ्नहर्ता श्री गणपतीला एक साकडं घातलं जात आहे. बाप्पा आम्हाला तारायला ये आणि या सगळ्यातून लोककलेचा विकास आणि लोककलेची समृद्धी होऊ दे. यासाठी हा घाट यंदाच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने घातला आहे.

लोकपरंपरा या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची एक शान आहे. त्याच प्रमाणे त्यातून होणारे प्रबोधन हे खरंतर आपल्या समाजासाठी आणि आपल्या निसर्ग संवर्धनासाठी अतिशय महत्वाचे आहे असं सांगणार भारुड, शाहिरी, कीर्तन या अशा प्रकारच्या लोककलेतून गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला होणार आहे. अशा विविध लोककला प्रकारांसाठी महाराष्ट्राची ओळख कायम टिकावी आणि निसर्गाचं कायम जतन व्हावं यासाठी कुडाळमधील नेरूर या गावात याच चित्रीकरण होत आहे.

ही मूळ संकल्पना आणि निर्मिती डॉ. सुमित पाटील यांची आहे. मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख श्री. गणेश चंदनशिवे यांनी हे गाणं स्वतः संगीतबद्ध करून आपल्या सुमधुर आवाजात गायलं आहे. या संकल्पनेचे लेखन डॉ. प्रणव प्रभू यांनी केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण आघडीचे छायाचित्रकार पराग सावंत आणि मिलिंद आडेलकर करीत आहेत. या गाण्यात पद्मश्री पुरस्कार पुरस्कार प्राप्त लोककलावंत श्री. परशुराम गंगावणे, सिद्धेश नेरुरकर, किशोर नाईक, शनी सोनावणे, प्रवीण बर्वेकर, संकेत जाधव, विजय वालावलकर, सुवर्णा वायंगणकर, संदेश कदम, शिवहरी रानडे, शाम तेंडुलकर, विठ्ठल तळवलकर आणि निलेश गुरव त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोककलावंत या उपक्रमात सहभागी असणार आहेत. या उपक्रमातून निसर्ग आणि लोककला संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स