तेली समाज उन्नती मंडळाची २४ जुलैला ओरोस येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणगौरव समारंभ..
शिरगांव |संतोष साळसकर :
तेली समाज उन्नती मंडळाची सन २०२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ रविवार दि.२४/०७/२०२२ ला सकाळी १०.३० वाजता ओरोस येथील ‘ईच्छापूर्ती’ हॉल, गोविंद सुपर मार्केटजवळ (मुंबई गोवा हायवे) येथे आयोजित केला आहे.
मंडळाच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन २०२२ च्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त, १२ वी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा जास्त, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत जिल्हा सचिवांजवळ पाठवावी. आर्थिक मदतीसाठीचे अर्ज तालुका मंडळामार्फत पाठवावेत. सदर माहिती दिनांक १५ जुलै २०२२ पर्यंत पाठवावी असे मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.त्यासाठी इच्छुकांनी चंद्रकांत तेली मोबा.नं. ९४२१२६६९२६ लक्ष्मण तेली मोबा.नं. ९४२२४३५००१ चंद्रकांत तेली मोबा.नं. ९४२१२६६९२६ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)