देवगडातील सेंद्रिय शेती स्पर्धेत साळशीचा प्रणव भटसाळसकर प्रथम..!
शिरगांव / संतोष साळसकर :
येथील महाविद्यालयात शेती कार्यशाळेचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या सेंद्रिय शेती स्पर्धेत साळशी येथील प्रणव भटसाळसकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले.
येथील महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियान विभाग व कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक शेती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेमध्ये ‘नैसर्गिक शेती’ या विषयास अनुसरून मृदा संवर्धन, पीक संरक्षण, देशी गायींचे शेतीमधील महत्त्व तसेच नैसर्गिक कीटकनाशके अशा विविध विषयांवर मार्गदर्शन झाले.
तसेच जीवांमृत बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यशाळेचे औचित्य साधून महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या सेंद्रिय शेती स्पर्धेचा पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रणव भटसाळसकर (साळशी), रामचंद्र सारंग (तिर्लोट), नंदकुमार तोडणकर (मिठमुंबरी) पहिले तीन आले. तर उत्तेजनार्थ म्हणून प्रभाकर कदम (आरे) आणि हनुमंत कांबळी (कुणकेश्वर) यांना देण्यात आले. कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. विलास सावंत, डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. केशव देसाई, प्रा. विकास धामापूरकर आदींनी मार्गदर्शन केले. विनायक ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. डी. पायघन, अजित कांबळे, वैभव साळसकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)