ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आमदार वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक खंबीर असल्याने  सिंधुदुर्गात शिवसेना जोमाने वाढेल : पुष्कराज कोल्हे
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक खंबीर असल्याने  सिंधुदुर्गात शिवसेना जोमाने वाढेल : पुष्कराज कोल्हे

प्रकाशन: 23 Jul 2022 04:15 PM
वाचन संख्या 67

इतर बंडखोर आमदारांवर पुष्कराज कोल्हेंनी केली जळजळीत टीका..

तेंडोली व झाराप जिल्हापरिषद  मतदारसंघाची विभागीय बैठक संपन्न.

कुडाळ | देवेंद्र गावडे : शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांच्या  विचारांनी  प्रेरित होऊन अनेक कट्टर शिवसैनिक तयार झालेत. बाळासाहेब, उद्धवसाहेब यांच्यामुळे  अनेक सामान्य शिवसैनिकांना मोठं मोठी पदे प्राप्त झाली.मात्र त्यातील काहीजणांनी आता शिवसेनेशी गद्दारी केली आहे. ज्या शिवसेनेने त्यांना सर्वकाही दिले त्याच शिवसेनेवर आता हे लोक खोटे नाटे आरोप करत आहेत.दीपक केसरकर, उदय सामंत यांनी शिवसेनेची मंत्री पदे  उपभोगून देखील गद्दारी केली.  आपले आमदार वैभव नाईक मात्र कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले त्याचा आपल्याला अभिमान  आहे. आ. वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत अनेक शिवसैनिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असल्याने जिल्ह्यात शिवसेना आणखी जोमाने वाढणार आहे. शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. असा विश्वास  उद्योजक पुष्कराज कोल्हे यांनी व्यक्त केला
       

कुडाळ तालुक्यातील तेंडोली व झाराप जिल्हापरिषद  मतदारसंघाची विभागीय बैठक शुक्रवारी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व उद्योजक पुष्कराज कोल्हे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली.  यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान कुडाळ तालुक्याच्या वतीने शिवसेनेशी व पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे  यांच्याशी  एकनिष्ठतेची प्रतिज्ञापत्रे देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
             याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले, ज्यावेळी आपण निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा मोजकेच कार्यकर्ते होते. याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माझ्याकडून एक रुपयाही न घेता त्यांनी स्वतः मेहनत  घेतल्याने  व जनतेच्या आशीर्वादामुळे  मी दोन वेळा आमदार झालो. हे मी कधीच विसरणार नाही. या शिवसैनिकांशी  मी प्रामाणिक राहून सर्वसामान्य लोकांसाठी काम करत राहणार आहे.गेलेले आमदार खासदार वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून गेले आहेत. हेच लोक जेव्हा शिवसेना भाजपची युती होती तेव्हा देखील निधी मिळत नाही म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तक्रारी करत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक शिवसेना आमदारांच्या विरोधात भाजपने आपले बंडखोर उमेदवार उतरवले होते. तेव्हा देखील हे  बंडखोर आमदार भाजपचा द्वेष करत होते.त्यामुळे या लोकांच्या वक्तव्यांना जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही. मी मंजूर करून घेतलेल्या काही कामांना सध्याच्या  सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र स्थगिती उठविण्यासाठी मी प्रयत्न करून कामे पूर्णत्वास नेणार आहे. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.


               यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे,उपतालुकाप्रमुख बाळू पालव, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,  तेंडोली विभाग प्रमुख संदेश प्रभू, झाराप विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, रुपेश पावसकर, हुममळा (वालावल) सरपंच सौ.अर्चना बंगे,   कवटी सरपंच रुपेश वाडयेकर,पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, आंदुर्ले सरपंच पूजा सर्वेकर,  राजू गवंडे, महेश वेळकर,दिनेश गोरे, मितेश वालावलकर, अमृत देसाई, अशपाक कुडाळकर, अनिकेत तेंडुलकर, बांदेकर, बबलू पिंगुळकर, भरत परब, राजेंद्र सडवेलकर, सुनील हळदणकर, सायली सर्वेकर, बांदेकर,आदींसह तेंडोली व झाराप जिल्हापरिषद  मतदासंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स