ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पिक पाहण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करा......
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पिक पाहण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करा......

प्रकाशन: 23 Jul 2022 02:32 PM
वाचन संख्या 33

मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचे आव्हाहन…..

मसुरे/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले असून आपल्या मोबाईल मधून एका ॲप द्वारे पिक पाहणी करावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या ॲपचा वापर करून जास्तीत जास्त ग्रामस्थ, शेतकरी यांना विनंती आहे की, त्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन मसुरे मंडल अधिकारी श्री सुहास चव्हाण यांनी मसुरे मर्डे ग्रामपंचायत हॉल येथे बोलताना केले.मसुरे-मर्डे ग्रामपंचायत हॉल येथे मसुरे मंडळ अधिकारी श्री.सुहास चव्हाण यांनी ई-पिक पाहणी अॅप बाबत एका कार्यशाळेत माहिती दिली. या वेळी बोलताना सुहास चव्हाण म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणी च्या नोंदी आपल्या गावाला नेमण्यात आलेल्या तलाठी मार्फत ह्या नोंदी तलाठी करत असायचे परंतु आता महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले आहे. या ई पीक पाहणीचा चा अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेतीतील पिकांची पाहणी करणे होय. या ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची पाहणी करून त्याची नोंद ही ई पीक पाहणी या ॲप वर करायची आहे. या वेळी सदरची पिक पाहणी ई-पिक पाहणी अपद्वारे कशी करायची याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच या ई- पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना कर्जाची आवश्यकता पडल्यास, त्यांना पीककर्ज सुद्धा मिळविण्यासाठी या ई- पीक पाहणी मुळे सुलभता येईल. तसेच एखाद्या वेळेस शेतकऱ्यांचे नुकसान झाले जसे पूर, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले तर या ई- पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना योग्य मदत मिळेल. तसेच या ई-पीक पाहणी मुळे राज्यामध्ये चालू वर्षी कोणत्या प्रकारचे पीक शेतकऱ्यांनी जास्त लागवड केली, तसेच कोणत्या पिकाची लागवड किती केली याचे अचूक क्षेत्र हे ई- पीक पाहणी मुळे कळणार आहे.आणि या मुळेच आपल्या राज्यातील आर्थिक पाहणी करणे आणि कृषी या क्षेत्राचे योग्य नियोजन करणे हे आता शक्य होणार आहे. त्याच प्रमाणे यावर्षी पासून पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी उपयोग होणार आहे. या वेळी भगवान जाधव,शरद मोरे,एस.आर.कांदळकर तलाठी देऊळवाडा,एस.आर.चव्हाण कोतवाल देऊळवाडा, एस.ए.नाईक कोतवाल माळगाव,एस.जे.चव्हाण कोतवाल मसुरे, व्ही.डी.पोयरेकर कोतवाल त्रिंबक, शैलेश मसुरकर ग्रामपंचायत लिपिक मसुरे- मर्डे,नारायण पांचाळ, प्रीतम जाधव,राजेंद्र जाधव, कौडीव्य पवार , महेश जाधव, निखिल जाधव, सुदर्शन मसुरकर, महेश खोत, विनोद मोरे, ठाकूर,वैभवी पेडणेकर, आदेश बागवे, लवकिक भोगले, खुशी परब, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते. वेळी मंडल अधिकारी चव्हाण यांनी मोबाईल द्वारे प्रात्यक्षिक दाखविले तसेच कोणत्याही शेतकरी ग्रामस्थ याला काही अडचण आल्यास त्वरित मसुरे मंडल अधिकारी किंवा संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.कॅप्शनमसुरे येथे मार्गदर्शन करताना मंडळ अधिकारी चव्हाण सोबत मान्यवर..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स