माजी खासदार डाॅ.निलेश राणेंन कडून गणेश भक्तांनसाठी धावणार "भाजपा एक्स्प्रेस".
दादर कुडाळ नाॅन-स्टाॅप धावणार ,कुडाळ मालवणसाठी मोफत…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्ताने कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गणेश भक्तांसाठी “भाजप एक्स्प्रेस” या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुटणा-या या भाजपा एक्स्प्रेस मधून गणेश भक्तांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हि रेल्वे दादर ते कुडाळ पर्यंत नाॅन-स्टाॅप धावणार आहे.
मुंबई मधून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी दादर ते कुडाळ स्थानका पर्यंत हि विशेष ट्रेन आयोजित करण्यात आली आहे. ही ट्रेन ३० ऑगस्टला दादर पूर्व रेल्वे स्टेशन सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि कुडाळ रेल्वे स्टेशनला संध्याकाळी ९ वाजता पोहोचेल. या ट्रेन मध्ये विनामूल्य तिकीट बुकिंगसाठी सकाळी ११ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत, संदीप-९६५३३८७९२२, राजेंद्र-८९२६९०२९९४, कुलदिप-८९२८९८९००१ यांच्याशी संपर्क साधावा बुकिंगसाठी आपले आधारकार्ड/मतदान ओळख पत्र एक आवश्यक आहे. सदर ट्रेन हि मालवण आणि कुडाळसाठीच असल्याने ओळखपत्र पडताळणी नंतरच आपले बुकिंग कन्फर्म होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)