ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
धामापूर येथे डंपरची विद्युत पोलला धडक…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

धामापूर येथे डंपरची विद्युत पोलला धडक…!

प्रकाशन: 19 Jul 2022 05:02 PM
वाचन संख्या 57

काही काळ वाहतूक ठप्प ; वीजपुरवठा खंडित.

चौके | अमोल गोसावी :
कुडाळ -मालवण मार्गावर धामापूर येथे मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. भरधाव डंपरची धामापूर ग्रामपंचायत नजीक रस्त्याकडेला असलेल्या ११ के. व्ही. पोलला धडक बसून 11000 व्होल्ट चा पोल उध्वस्त झाला आणि सर्व विद्युत तारा तुटून रस्त्यावर पडल्या. पोलला धडक दिल्यानंतर डंपर रस्त्याकडेला असलेल्या झाडाला अडकून राहिला अन्यथा २० फूट खोल भागात डंपर कोसळून मोठे नुकसान झाले असते. या अपघातात चालकास कोणतीही दुखापत झाली नाही परंतु वीज वितरणचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वीज कर्मचारी यांनी सांगितले.


सदर डंपर क्रमांक MH 08 H 2200 गोवा येथे चिरे वाहतूक करून चौके येथे परतताना हा अपघात झाला असून डंपरच्या केबिनचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती आणि गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. यावेळी वीज वितरण चे कर्मचारी सागर गावठे , योगेश काळसेकर , आबा परब यांनी तातडीने घटनास्थळी येत वीजपुरवठा खंडीत करून स्थानिक आणि वाहनचालकांच्या मदतीने रस्त्यावरील विद्युत पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स