बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या वतीने आमदार सचिनभाऊ आहिर यांना निवेदन.
शिरगांव |संतोष साळसकर :
शिवसेनेचे उपनेते तसेच आमदार सचिनभाऊ अहिर यांना वीर जिजामाता नगर, वरळीच्या ते बालमोहन,एस टी ऑफिस ते बालमोहन,वरळी नाका -जांबोरी मैदान ते बालमोहन, सर पोचखनवाला मार्ग ,वरळी ते बालमोहन,वरळी कोळीवाडा ते बालमोहन या कोरोना काळापासून बंद असलेली बेस्टची स्कूल बस सेवा पुन्हा सुरू करून खाजगी स्कूल बसचे भाडे न परवडणा-या पालकांना दिलासा द्यावा. या मागणीचे पत्र बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या वतीने सचिनभाऊ अहिर यांना देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर तसेच त्यांच्यासोबत जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ हे उपस्थित होते.
यावेळी सचिनभाऊ अहिर यांनी नगरसेवक सुनिल भाऊ अहिर (लाली)यांना बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.तसेच या बैठकीला स्वतः सचिनभाऊ अहिर हे जातीने उपस्थित रहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)