ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>मारुती मंदिर देवस्थान समिती कुडाळ बाजार पेठ आयोजित भजन स्पर्धा…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>मारुती मंदिर देवस्थान समिती कुडाळ बाजार पेठ आयोजित भजन स्पर्धा…!</em>

प्रकाशन: 12 Jul 2022 04:26 PM
वाचन संख्या 124

श्री. दत्तगुरु प्रासादीक भजन मंडळ वैभववाडी प्रथम.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :

आषाढी एकादशी निमित्त कुडाळ बाजार पेठ मारुती मंदिर देवस्थान समिती हरिनाम सप्ताह ४जुलै ते १० जुलै या कालावधीत आयोजित भजन स्पर्धेत श्री. दत्तगुरु प्रासादीक भजन मंडळ वैभववाडी बुवा श्री विकास नर यांनी प्रथम मिळवीला त्यांना कै. अनंत शेठ शिरसाट व कै. नरहरी शेठ शिरसाट यांच्या स्मरणार्थ १११११ रु रोख, चषक देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय क्र. रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी बुवा रुपेश जामकर यांना रोख ७७७७ रु. व चषक, तृतीय क्र. सद्गुरु प्रासदीक भजन मंडळ तुळस, बुवा पुरुषोत्तम परब यांना रोख ५५५५ रु. चतुर्थ क्र. स्वामी समर्थ प्रासादीक भजन मंडळ कलबिंस्त बुवा संतोष धरणे यांना ३३३३ रु. पाचवा स्वरधारा प्रासादीक भजन मंडळ तांबोळी बुवा अमित तांबोळकर, सहावा श्री. रवनाथ प्रासादीक भजन मंडळ, पांडलोस-बुवा अजित गावडे, सातवा- महापुरुष भजन मंडळ भोगवे बुवा तुषार खुळे यांना रोख पारितोषिके देऊन गौरवीण्यात आले.
सात दिवस चाललेल्या या सप्ताहात रोज ५ भजनी मंडळांनी आपली कला सादर केली त्या ३५ मंडळातून वरील सर्व क्रमांक दिले गेले. मारुती मंदिर समिती कडून सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स