<em>भाजप भटके-विमुक्त आघाडी कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख पदी महेश वरक यांची निवड…..!</em>
माजी खासदार माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रप्रदान करत जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर.
मालवण | विनीत मंडलिक :
भाजप भटके-विमुक्त आघाडी मालवण माजी तालुका अध्यक्ष महेश वरक यांना भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालय येथे माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या हस्ते भाजप भटके विमुक्त आघाडी कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले. भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार नितेश राणे व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवड केली जाहीर.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण,भाजप भटके विमुक्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर,भाजप दिपक पाटकर, सुदेश आचरेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख महेश वरक,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा युवा अध्यक्ष महेश जंगले व पदाधिकारी बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)