ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कल्पवृक्षाच्या पाना, फळांनी साकारला विठुराया..!

कल्पवृक्षाच्या पाना, फळांनी साकारला विठुराया..!

प्रकाशन: 09 Jul 2022 04:22 PM
वाचन संख्या 169

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना देखील अनन्यसाधारण महत्व आहे याची जाणीव करून देणारा एक संप्रदाय म्हणजेच आपला वारकरी संप्रदाय होय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया देखील वारी करीत असतात. वर्षाचे अकरा महिने घर , संसार, चूल , मूल, शेत आणि व्यवसाय सांभाळणाऱ्या स्त्रियांना जेव्हा वारीचे वेध लागतात तेव्हा त्यांच्या मनात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागतात.


निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणातील स्त्रियांना देखील या वारीचा मोह आवरता आला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील केर आणि मोर्ले या गावातील स्त्रियांनी एकत्र येऊन कल्पवृक्षाच्या पांनाचा आणि फळांचा वापर करून विठुराय साकारला आहे. या अनोख्या निसर्गवारीतून त्याचे निसर्गाबद्दल असलेले प्रेम आणि चराचरात त्यांना दिसणारा विठ्ठल याचे साक्षात दर्शन घडवले आहे.


ही मूळ संकल्पना श्रीरंग चॅरिटेबलचे डॉ. सुमित पाटील यांची असून त्यांनी स्वतः या वारीच्या छायाचित्रणाचे दिग्दर्शक केले आहे. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद आडेलकर याने या वारीचे चित्रीकरण केले आहे. डॉ. प्रणव प्रभू यांनी या वारीचे लेखन आणि उदय सबनीस यांनी आपल्या भारदस्त आवाजात या वारीचे विश्लेषण केले आहे. किशोर नाईक, संकेत ठाकूर , विजय वालावलकर , योगेश राजे भोसले, गौरेश राणे, वैभव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या निसर्गवारीचा व्हिडीओ सुद्धा सध्या समाज माध्यमांवर खूप चर्चेचा विषय बनत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स